बटाटा त्वचेचा रंग सुधारण्यासाठीही उत्तम मानला जातो. याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या सहज फेशियल करू शकता. त्वचेवरील काळे डाग तसेच त्वचेच्या अनेक समस्या घालवण्यासाठी घरच्या घरी बटाट्याच्या मदतीने फेशियल करू शकता. बटाट्यासह फेशियल कसे बनवायचे ते जाणून घ्या.
फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यावेत. त्यात दही आणि चिमूटभर हळद मिक्स करा. ब्रश किंवा हाताच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. त्यानंतर सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा आणि चेहरा धुवा. दही आणि बटाटे एकत्र केल्याने त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत होईल.
क्लिंजींग झाल्यानंतर त्वचेला स्क्रब करा. त्यासाठी बटाट्याच्या रसात तांदळाचे पीठ मिक्स करावे. त्यासोबत थोडं दही घालू शकता. या पेस्टने चेहरा नीट स्क्रब करा आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हे चेहऱ्यावरील सर्व डेड स्किन काढून टाकेल.
क्लिंजिंग केल्यानंतर चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करणे आवश्यक आहे. यासाठी बटाट्याची पेस्ट बनवा आणि नंतर त्यात एलोवेरा जेल मिक्स करा. या पेस्टने चेहऱ्याला ५-७ मिनिटे मसाज करा. मसाज केल्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
फेशियलची शेवटची स्टेप म्हणजे फेस पॅक. यासाठी एका वाटीत बटाट्याच्या पेस्टमध्ये दही मिक्स करा आणि हळद घाला. चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. आता ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर चांगली लावा आणि कोरडी होऊ द्या. आता ते स्वच्छ पाण्याने धुवा.
Previous ArticleKolhapur : सुट्टीवर आलेल्या जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
Next Article डेगवे बाजारवाडी येथील सौ.योजना केसरकर यांचे निधन !









