ओटवणे प्रतिनिधी
Inspection of damage in Sangeli by Tehsildar!
नुकसानीचे पंचनामे करण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना
सांगेली परिसरात शनिवारी वादळी पावसामुळे घरे, दुकान, शेतमांगरासह बागायतीची झालेल्या नुकसानीची रविवारी सावंतवाडीचे तहसिलदार अरुण उंडे यांनी सरपंच लवू भिंगारे आणि महसूल व कृषि खात्याच्या अधिकाऱ्यांसह नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित मंडळ अधिकारी श्री गुरव, तलाठी श्री डवरे, कृषि अधिकारी श्रीम तावडे यांना या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी लवू भिंगारे यांनी या वादळी पावसामुळे सांगेली गावात सुमारे एक कोटीचे नुकसान झाले आहे. यात पन्नासहून अधिक घरांसह शेतमांगर आणि दुकान यांचा समावेश आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना शासनाकडुन तात्काळ व योग्य मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी तहसिलदार विलास उंडे यांच्याकडे केली. तसेच विद्युत तारावर झाडे कोसळून तसेच वीज खांब जमीन दोस्त झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून वीज वितरण कंपनीने याची तात्काळ दखल घेत विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी सरपंच लवू भिंगारे यांनी केली आहे.यावेळी सांगेली ग्रामसेवक कांता जाधव, बाळा राऊळ, उमेश राऊळ, पुरूषोत्तम राऊळ, एकनाथ राऊळ, नितीन सांगेलकर, वामन नार्वेकर, आप्पा आंगचेकर, प्रकाश राऊळ, समीर आंगचेकर आदी उपस्थित होते.