प्रतिनिधी/ बेळगाव
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत खोक्यांवर कारवाई केली जात आहे. मागील दोन दिवसांपासून अतिक्रमण हटाव विभागाकडून रस्त्याशेजारी अथवा सरकारी जागांमध्ये उभारण्यात आलेले स्टॉल व खोकी हटविण्यात आली.
कॅन्टोन्मेंट बोर्डकडून अनधिकृत बॅनर्सवर कारवाई केल्यानंतर आता महानगरपालिकेनेही कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याशेजारी तसेच सरकारी खुल्या जागांमध्ये अनेकांनी बेकायदा स्टॉल उभारले होते. हे स्टॉल वाहतुकीसाठी अडचणीचे ठरत असल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अशा स्टॉलवर कारवाई केली जात आहे.









