केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आणि भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू आणि तामिळनाडूतील प्रभावी नेते सी. आर. केशवन यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व बहाल केले. यावषी 23 फेब्रुवारी रोजी केशवन यांनी वैचारिक मतभेदांचे कारण देत काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांच्या पक्षप्रवेशाने दक्षिण भारतात पक्षाचे बळ वाढण्यास मदत होईल, असा दावा भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून केला जात आहे.
केशवन यांनी पक्षप्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीचे कौतुक केले. पंतप्रधानांची लोककेंद्रित धोरणे आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनामुळे सुधारणांना वाव असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना सिंग यांनी राजगोपालाचारी यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. तसेच दक्षिण भारतात आता भाजपचा प्रभाव वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत दक्षिणेकडील वेगवेगळ्या राज्यांतून अनेक नेते भाजपात दाखल होत आहेत. केरळचे दिग्गज काँग्रेस नेते ए. के. अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. किरणकुमार रे•ाr हेदेखील नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.









