9.4.23 ते 15.4.23 पर्यंत
मेष
या आठवड्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. काही निर्णय तुमच्या हातून असे घेतले जाण्याची शक्मयता आहे की, ज्याने आर्थिक नुकसान होऊ शकते. व्यावसायिकांनी कुठल्याही मोहाला बळी पडू नये. नवीन संधी प्राप्त होण्याच्या मार्गावर आहेत. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास यश तुमचेच आहे.
अंघोळीच्या पाण्यात इलायची घालावी.
वृषभ
कामांमध्ये सफलता मिळण्याच्या दृष्टीने, मित्र परिवारात मान सन्मानाची वाढ होण्याच्या दृष्टीने हा आठवडा खूप चांगला जाईल. तुमच्या विवेकबुद्धीने आणि कष्टाच्या जोरावर यश प्राप्त कराल. मनात संशयाला जागा देऊ नका. कामे होतील की नाही किंवा समोरची व्यक्ती बरोबर वागेल की नाही, अशा विचारांनी कामे बिघडू शकतात.
पांढरी मिठाई दान द्या
मिथुन
या आठवड्यात कोणाशीही मतभेद होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. आप्त स्वकीयांशी चांगले संबंध ठेवले तर फायदा होईल. नकळत एखादा वाकडा शब्द तोंडून निघाला तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक असेल. व्यावसायिकांना नवीन योजनांवर काम करावे लागेल.
लाजाळूचे झाड घरी लावा
कर्क
सगळे बरोबर चाललेले असतानासुद्धा मनात एखादी खंत असावी, अशी काहीशी तुमची अवस्था होण्याची शक्मयता आहे. कष्टाचे आणि मेहनतीचे प्रमाण वाढवल्यामुळे यश प्राप्त होईल. गेल्या काही दिवसात जो थोडा मानसिक त्रास झाला, तो आता कमी होईल. इतरांच्या सुख, दु:खामध्ये सामील होण्याच्या स्वभावामुळे समाधान मिळेल.
जल दान द्यावे
सिंह
कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये इतर कोणाकडूनही कसलीही मदत मिळण्याची शक्मयता नाही. त्यामुळे अपेक्षा करू नका. तुमची कामे स्वत: तुम्हालाच करावी लागतील. एखाद्या घटनेबद्दल तुम्ही बऱ्याच दिवसापासून स्वप्न पाहत होता, ती घटना घडण्याची शक्मयता आहे. एखादी व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे न वागता उलट धोका देण्याची शक्मयताही आहे.
सोनेरी पेन जवळ ठेवा
कन्या
या आठवड्यात सुखद घटना घडतील. जे लोक विवाहाकरता किंवा नवीन नातेसंबंधाकरता प्रयत्न करत आहेत, त्यांना चांगली बातमी कळेल. काही लोकांशी मात्र मतभेद होऊ शकतात. त्यावेळी आपला विचार मांडत असताना काळजीपूर्वक मांडावा. व्यावसायिकांना काही लोकांच्यामुळे नुकसान सोसावे लागू शकते.
अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घालावी
तुळ
केलेली मेहनत कधीही वाया जात नाही. याचा संदेश देणारा हा आठवडा असेल. आनंदी घटना घडतील. मन प्रसन्न असेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. नसांचे दुखणे त्रास देऊ शकते. इच्छापूर्ती करता भरपूर मेहनत घेण्याची इच्छा असली तरी प्रत्यक्षात काम केल्याशिवाय यश मिळणे कठीण असते. व्यवसायिकांना नफा होईल.
तीन गोमती चक्र जवळ ठेवा
वृश्चिक
कोणत्याही कामामध्ये घाई, गडबड केल्यास नुकसान होऊ शकते, हे ध्यानी ठेवावे. स्वत:च्या इच्छापूर्तीकरता दुसऱ्यांची मतेसुद्धा ऐकून घ्यावी लागतात, किंबहुना इतरांचा सल्ला ऐकल्यास फायदा होऊ शकतो. समाजात आणि मित्रपरिवारात मानसन्मान प्राप्त होईल. संयमपूर्वक काम केल्यास यश तुमचेच असेल.
कुत्र्याला चपाती घालावी.
धनु
या आठवड्यात कित्येक आनंदाचे प्रसंग येतील. काही समारंभांमध्ये भाग घेण्याचा मान मिळेल. जवळच्या व्यक्तींसोबत पार्टी कराल. नवीन संधींच्या प्रतीक्षेत न राहता, संधी तयार कशा करता येतील, याकडे लक्ष असेल. योग्य व्यक्तींकडून कामे करून घेतल्याने यश मिळेल. तब्येतीला जपायला हवे. आर्थिक आवक समाधानकारक असेल.
छोटी चांदीची वस्तू दान द्या.
मकर
एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करायची संधी मिळेल. ज्यामुळे पुढे जाऊन चांगले यश प्राप्त होऊ शकते. पण त्याकरता योग्य त्या योजनेची गरज आहे. सध्याचा काळ हा व्यापार वाढवण्याकरता किंवा नवीन एखादे काम करण्याकरता चांगला आहे. काही शुभसंकेतही मिळण्याची शक्मयता आहे. स्पष्टवक्तेपणा एखाद्याला दु:ख देऊ शकतो.
गरजूला अन्नदान करा.
कुंभ
या आठवड्यात काहीसा निराशाजनक मूड असू शकतो. थोडी हताशा थोडी निराशा अशा पद्धतीचे वातावरण अनुभवायला येईल. त्याचबरोबर काही घटनांमुळे उत्तेजित होण्याची शक्मयताही आहे. अशावेळी आत्मनियंत्रण ठेवावे लागेल. डोळे बंद करून कुठल्याही निर्णयापर्यंत येऊ नका. योग्यवेळेची वाट बघण्यात शहाणपण आहे.
सुगंधी अत्तर जवळ ठेवा.
मीन
एखाद्या नवीन नात्याची सुऊवात होण्याची शक्मयता आहे, जे नाते बऱ्याच काळापर्यंत साथ देईल. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या राजकारणामध्ये न अडकता त्यावर मात कराल. आनंददायी घटना घडण्याची शक्मयता आहे. तुम्हाला विरोध करणाऱ्यांना त्यांच्याच कृत्याचा पश्चात्ताप होईल. तब्येत सांभाळावी लागेल.
भटक्या जनावरांना खाणे द्या.
आंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ घातले तर चमत्कारिक अनुभव येऊ शकतात. दोन वेलदोडे घातले तर सुख समृद्धी येते. चमचाभर दूध घातले तर मानसिक शांतता प्राप्त होते. दही घातले तर कामांमध्ये यश मिळते. काळे तीळ घातले तर नजर लागत नाही. थोडी हळद घातली की नशीब सुधारते. तापवून लाल झालेला लोखंडाचा तुकडा घातला तर भीती दूर होते.





