संध्याकाळचा नाश्ता असो वा सकाळचा नाश्ता, रोज काय बनवायचे हा प्रत्येक महिलेला प्रश्न पडतो.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट होणारा शेवया उपमा कसा बनवायचा ते सांगत आहोत. घरी बनवलेल्या गव्हाच्या, रव्याच्या शेवया पासून तुम्ही हा उपमा बनवू शकता. किंवा बाजारात मिळणाऱ्या भाजेलल्या शेवया देखील घेऊ शकता. विशेष म्हणजे ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट बनते.
साहित्य
शेवया
१ लहान बटाटा
१ कांदा
२ ते ३ हिरवी मिरची
कोथिंबीर
मोहरी
लिंबाचा रस
मीठ चवीनुसार
हळद
२ हिरव्या मिरच्या
कडीपत्ता
पाणी
तेल
कृती
शेवया उपमा बनवण्यासाठी तुम्ही घरी तयार केलेल्या शेवया वापरणार असाल तर त्या नीट भाजून घ्या. कांदा,बटाटा(साले काढून)आणि मिरची बारीक चिरून घ्या. आता एका कढईत तेल गरम करा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप देखील वापरू शकता. तेल गरम झाल्यानंतर यात मोहरी, कांदा,हिरवी मिरची आणि कडीपत्ता टाका. साधारण २ ते ३ मिनीट भाजून घ्या. कांदा थोडासा ब्राऊनिश झाल्यानंतर यात बटाटा टाका. यावर आता झाकण ठेवून हे नीट शिजू द्या. यानंतर त्यामध्ये हळद, मीठ टाका आणि मिक्स करा. आता शेवया टाका आणि गरजेनुसार पाणी टाकून पुन्हा झाकण ठेवा. काही वेळाने शेवया शिजल्यानंतर झाकण काढा. त्यातील पूर्ण पाणी आटल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घाला. कोथिंबीरने गार्निश करून सकाळच्या नाष्टयात गरमा गरम सर्व्ह करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









