पालिका मंडळाच्या बैठकीत निर्णय; व्यापारी संघटनेकडून दरवाढीला विरोध
म्हापसा : म्हापसा नगरपालिकेची खास बैठक गुऊवारी सायंकाळी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. या बैठकीत 2023-24 वर्षासाठी मार्केट परिसरात पे पार्किंग शुल्क व मार्केट सोपो दरही वाढविण्याचा निर्णय घेतला. म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत यांनी पालिकेच्या दरवाढीला आक्षेप घेतला असून पालिकेने नाहक सोपो व पार्किंग शुल्क वाढवून बाजारपेठेतील दुकानदारांना व बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना पार्किंग शुल्क लादून त्यांच्यावर नाहक अतिरिक्त शुल्काचे ओझे लादू नये, असे म्हटले आहे. यावेळी मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर, उपनगराध्यक्ष विराज फडके व इतर नगरसेवक उपस्थित होते. तर नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर व केल ब्रागांझा या अनुपस्थित होत्या.
दुकानांना 10 तर कारला प्रत्येकी 2 तासाला 20 ऊपये
मार्केट पे-पार्किंग शुल्क वाढविले आहे. दुचाकीसाठी दोन तासांसाठी 10 ऊपये, तर चारचाकीला दोन तासाला 20 ऊपये. यंदा पे-पार्किंगची बोली ही 1 कोटी ऊपये असेल. पालिका मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन अतिरिक्त शुल्काला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी दिली.
शेडमध्ये 40 ऊपये तर बाहेरील विक्रेत्यांना 25 ऊपये प्रतिचौमीटर
2023-24 साठी मार्केट सोपो दर वाढविला असून त्याचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार शेडमधील विव्रेत्यांना प्रति चौरस मीटर 40 ऊपये व तर शेड बाहेरील विव्रेत्यांना 25 ऊपये प्रति चौरस मीटर दर ठरविण्यात आले. या सोपो कंत्राटामध्ये कचरा शुल्क समाविष्ट केला आहे. या कंत्राटची बोली ही 2 कोटी 42 लाख 24 हजार इतकी असणार आहे, असे नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नगरसेवक अॅड. शशांक नार्वेकर यांनी मार्केट क्षेत्राबाहेर रस्त्यावर बसणाऱ्या अनधिकृत विव्रेत्यांवर कारवाईची मागणी केली. कारण या विव्रेत्यांमुळे पालिकेचा महसूल बुडतोच, याशिवाय बाजारपेठेतील सर्व विव्रेत्यांचे मोठे आर्थिन नुकसान होते, याकडे त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.
पार्किंग सुविधा देण्यात पालिका अपयशी : अध्यक्ष श्रीपाद सावंत

म्हापसा व्यापारी संघटनेने पार्किंग शुल्क व सोपो दर वाढीला तीव्र विरोध दर्शवित पालिकेचा निषेध केला आहे. म्हापसा बाजारपेठेत पार्किंगची सुविधा करण्यास म्हापसा पालिका सपशेल अपयशी ठरल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत यांनी म्हटले आहे. शिवाय बाजारपेठेत सर्व बिगर गोमंतकीयांनी व्यापले असल्याचे त्यात म्हटले आहे. म्हापशात भले मोठे प्रकल्प उभे राहत असून त्यांना यात पार्किंगची सुविधा देण्यात आली नाही. म्हापशात छोटे छोटे दुकानदार गाळेधारक आपला व्यवसाय करतात. पायाभूत सुविधाही योग्यरित्या मिळत नसल्याचे सांगून या दरवाढीबाबत पुन्हा विचार करावा, असे सावंत यांनी म्हटले आहे.









