लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्यात तसतसे काँग्रेसचे जहाज बुडण्याच्याच मार्गावर जात आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री व काँग्रसचे सच्चे दिलवाले अत्यंत प्रामाणिक नेते ए. के. अँटोनी यांचे चिरंजीव अनिल अँटोनी यांनी आपल्या वडिलांच्या विरोधात पाऊल उचलून ते थेट भाजपमध्ये गेले. याच गडबडीत आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसनेते किरणकुमार रे•ाr यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. या दोन नेत्यांच्या जाण्याने पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असे काँग्रेसने केवढेही सांगितले तरी काँग्रेस पक्षासाठी हे जबरदस्त धक्के आहेत. पुढील वर्षी म्हणजेच साधारणत: मार्चपासून लोकसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी सध्या कर्नाटक विधानसभेची निवडणूक, त्यानंतर मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड इत्यादी महत्वाच्या राज्यांच्या, त्याचबरोबर आंध्रप्रदेश आणि तेलंगण या राज्यांच्याही निवडणुका होणार आहेत. एक प्रमुख विरोधीपक्ष या नात्याने काँग्रेस पक्षाला सध्या पुढाकार घेऊन इतर विरोधी पक्षांची पुन्हा एकदा मोट उभारणे आवश्यक आहे. काँग्रेसचे अंतर्गत राजकारण पाहता हा पक्ष पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे गगनभरारी मारील असे वाटत नाही. राहुल गांधी हे एकटे युवा नेते वगळले तर बहुतांश नेते हे ‘साठी’ पार करून हातात ‘काठी’ घेऊन उभे आहेत. गांधी घराण्याचा एकेकाळी असलेला करिष्मा संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे या पक्षाकडे देशाचे उज्वल भवितव्य म्हणून पहाण्यासाठी नेमके कोणते घटक आहेत? हे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना उमजत नाही. गांधी घराण्याच्या परंपरेवर आणि निष्ठेवर एवढी वर्षे हा पक्ष चालला. आज राहुल गांधी यांना पक्षाने पुढे नेऊन पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले तरी जनतेच्या मतप्रणालीवर फारसा प्रभाव पडू शकतो का? हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक राज्ये काँग्रेसला आपल्या ताब्यात घ्यावयाची आहेत. त्या दृष्टिकोनातून पक्षाने काही प्रमाणात सुरू केलेल्या प्रयत्नांना म्हणावे तेवढे यश प्राप्त होत नाही. काँग्रेस पक्षाने अनेक वर्षे सत्तेवर असताना केलेल्या चुका अद्याप पक्षाला निस्तरता येत नाहीत. केरळचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते ए. के. अँटोनी यांनी शुक्रवारी भाजपमध्ये केलेला प्रवेश धक्कादायक म्हणावा लागेल. या दिवसांमध्ये काँग्रेसला एकामागोमाग धक्के बसत आहेत. एकेक धक्का काँग्रेसच्या जिव्हारी लागत आहे. काँग्रेसचे निष्ठावंत मंडळी थेट भाजपमध्ये प्रवेश करणारी ठरतात, यामागील एकच कारण ‘सत्ता!’ भाजपचे हळूहळू वेगाने काँग्रेसीकरण होतेय याची जाणीव भाजपला होतेय की नाही, माहीत नाही. मात्र संपूर्ण देशात सध्या राजकीय पातळीवर होत असलेले बदल हे भाजपसाठी फायदेशीर ठरत आहेत.

काँग्रेसची डोकेदुखी वाढत आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियान सुरू करून कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंत जी यात्रा काढली त्याचे चांगले परिणाम होतील, अशी काँग्रेसला अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे कार्यकर्ते जमले परंतु पक्षाला म्हणावे तसे यश त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतून प्राप्त झाले नाही. ए. के. अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी तापदायक ठरणार आहे. केरळमध्ये आजपर्यंत भाजपला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जागा ही महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवून व उद्दिष्ट समोर ठेवूनच कार्य करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुऊवारी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त केलेल्या भाषणातून स्पष्ट संकेतांसह केले होते. भाजपला या आगामी लोकसभा निवडणुकीत फार मोठा चमत्कार होईल असे वाटत नाही. त्यासाठी प्रत्येक जागा ही भाजपसाठी फार प्रतिष्ठेची ठरणारी आहे आणि काँग्रेस ज्या ठिकाणी मजबूत आहे त्या ठिकाणावरून भाजपने काँग्रेसला ललकारायला प्रारंभ केलेला आहे. अनिल अँटोनी यांनी दिलेला राजीनामा निश्चित गंभीर स्वरूपाचा आहे. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रे•ाr यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश करणे हे काँग्रेस पक्षासाठी जादा महागात पडणारे आहे. काँग्रेसचे एकापेक्षा एक चांगले नेते हे भाजपमध्ये का जाताहेत, याची चौकशी अगोदर करणे आवश्यक आहे. काँग्रेस ही खरोखरच बुडती नौका ठरत आहे. कशामुळे? काँग्रेस पक्षाने व्यापक धोरण पक्षात लागू केले पाहिजे. पक्षातील सारी महत्त्वाची युवा पिढी आणि शिलेदार हे भाजपकडे आकृष्ट होत आहेत हे निश्चितच राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षासाठी एक प्रकारचा इशारा आहे. किरणकुमार रे•ाr हे आंध्रप्रदेशमधील लोकप्रिय नेते आहेत व ते माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनीदेखील पक्षाला जय श्रीराम! म्हणणे ही गोष्ट पक्षाने गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. राहुल गांधी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाही आहेत. तरीदेखील पक्षाचा रिमोट हा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या हाती आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे जरी राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी पक्ष हा पुत्र आणि माता या दोन्हींचे प्रमुख नेते चालवित आहेत. पक्षाला अनेक निवडणुकांमध्ये जो पराभव सहन करावा लागला त्याला बाह्याशक्ती नव्हे तर पक्षीय पातळीवर अंतर्गत रूसवेफुगवे घेऊन बसलेली मंडळींसह अंतरशक्तीच कारणीभूत आहे. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचा होत असलेला ऱ्हास या परिस्थितीलादेखील पक्षातील नेतेमंडळीच जबाबदार आहेत. किरण रे•ाr यांनी दिलेला राजीनामा आणि अनिल अँटोनी यांनीही पक्षाला टाटा बाय बाय केले या धक्क्यातून काँग्रेस पक्ष सावरणार की नाही? राजस्थानचे नेते सचिन पायलट हे अस्वस्थ आहेत. त्यांना पक्ष कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देत नाही व त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. आता ते लोकसभा व राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रतिक्षेत रहातील. अन्यथा तेदेखील काँग्रेस पक्ष सोडून जातील. काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवर होत असलेली पडझड पाहता विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पक्ष आपल्या खांद्यावर जबाबदारी पेलू शकणार नाही हे स्पष्ट होते.








