नवी दिल्ली
निस्सान मोटर इंडिया यांनी आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या 11 महिन्यात वाहन उत्पादनात 23 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. पुरवठा साखळी विस्कळीत असतानाही कंपनीने ही वाढीव कामगिरी नोंदली आहे. आर्थिक वर्ष 2023 हे कंपनीसाठी अनेक आव्हाने घेऊन आलं होतं. सेमीकंडक्टरच्या टंचाईसह पुरवठा साखळी नियमीत नसण्याचा त्रास कंपनीला नाही म्हटला तरी झालाच. पण फेब्रुवारीत कंपनीने उत्पादनात चांगली कामगिरी नोंदवली. फेब्रुवारीपर्यंत जवळपास 83 हजार वाहनांचे उत्पादन घेत 23 टक्के इतकी वाढ उत्पादनात कंपनीने नोंदवली आहे.
पुरवठा साखळी सुरळीत
जागतिक स्तरावरची पुरवठा साखळी विस्कळीत जी झाली होती ती चर्चेतून दूर करण्यात आली असून आता उत्पादन वाढीसाठी आगामी काळात भर दिला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









