श्वानाऐवजी पुन्हा चिमणी स्थिरावणार
सॅन फ्रान्सिस्को :
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो पुन्हा एकदा बदलला आहे. या अगोदर तीन दिवसांपूर्वी चिमणीचा लोगो काढून टाकत त्या ठिकाणी श्वानाचा लोगो प्रसिद्ध केला होता. परंतु हा बदल अॅपवर नसून केवळ वेब आवृत्तीवर करण्यात आला होता. मात्र त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता व लोगो बदलल्यानंतर क्रिप्टोकरन्सी डॉजकॉइनमध्ये सुमारे 10 टक्क्यांची घसरण झाली होती. यामुळे तत्काळ हा निर्णय मस्क यांनी मागे घेतला आहे.









