दोडामार्ग / प्रतिनिधी
Sandeep Desai as President of Dodamarg Taluka Journalist Committee!
दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी संदीप अमृत देसाई यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिव पदी तरुण भारतचे साटेली भेडशी प्रतिनिधी गणपत डांगी यांची निवड करण्यात आली.दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यासाठी आज येथील स्नेहरेसिडेन्सी हॉल मध्ये निवड प्रक्रिया पार पडली. जिल्हा पत्रकार समितीचे खजिनदार ऍड. संतोष सावंत यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले. जुन्या कार्यकारणीला दोन वर्षे पूर्ण झाल्याने नव्या कार्यकारणीच्या निवड प्रक्रिया गुरुवारी संपन्न झाली. यावेळी सहा जणांनी अध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली. मात्र यानंतर चर्चेअंती सर्वानुमते अध्यक्षपदी श्री. देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर बोलताना श्री. देसाई म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग मधील पत्रकारांचे पत्रकारितेत मोठे योगदान आहे. दोडामार्ग हा नवका तालुका असल्याने या तालुक्यात आता पत्रकारितेचे व्यापक स्वरूप विस्तारत चालले आहे. यामुळे दर्जात्मक पत्रकारिता कशी होईल यासाठी मार्गदर्शन शिबिरे, पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर, प्रोत्सहनासाठी पुरस्कार वितरण , विविध उपक्रम, ग्रुप इन्शुरन्स सारख्या अभिनव उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. व सर्व उपस्थित पत्रकारांचेही आभार मानले. या निवडीनंतर निवडणूक निरीक्षक ऍड. संतोष सावंत व यांनी संदीप देसाई व नवनिर्वाचित कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी जिल्हाकार्यकारणी सदस्य लखू खरवत हेही उपस्थित होते.
नुतन कार्यकारणी पुढील प्रमाणे – अध्यक्ष संदीप अमृत देसाई, सचिव गणपत ज्ञानेश्वर डांगी, उपाध्यक्ष साबाजी उमाकांत सावंत, शंकर मधुकर जाधव, खजिनदार रत्नदीप गवस, सदस्य प्रभाकर अंकुश धुरी, सुहास नारायण देसाई, वैभव विद्याधर साळकर, तेजस तुकाराम देसाई, संदेश बाबासाहेब देसाई, पराग महादेव गावकर, सुनील विनायक नांगरे, लखू बाबू खरवत, ऋषिकेश सीताराम धरणे, महेश यशवंत लोंढे, समीर रोहिदास ठाकूर, ओम शिवाजी देसाई, भिकाजी दत्ताराम गवस, राजेश विलास देसाई, गजानन नारायण बोंद्रे आदी उपस्थित होते.









