यजमान संघ नेतृत्वाच्या समस्येबरोबर दुखापती आणि प्रमुख खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे त्रस्त
वृत्तसंस्था/ कोलकाता
दुखापतींमुळे आणि प्रमुख खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे त्रस्त असलेला दोन वेळचा विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सामना करणार असून यावेळी घरच्या मैदानावर खेळण्याच्या अनुकूलतेचा फायदा घेऊन विजयाच्या मार्गावर परतण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
मोहिमेची सुऊवात करतानाच मोहाली येथे पंजाब किंग्सविऊद्ध डकवर्थ-लुईस पद्धतीने सात धावांनी पराभव पत्कराव्या लागलेल्या केकेआरला दुहेरी फटका बसला आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याने कौटुंबिक कारणांमुळे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बांधिलकीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या फलंदाजीचा मुख्य आधार असलेला नियमित कर्णधार श्रेयस अय्यर याच्या पाठीच्या दुखापतीसंदर्भात शस्त्रक्रिया होणार असल्याने तो संपूर्ण आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले.
मोसमाच्या उत्तरार्धात नियमित कर्णधार अय्यर परत येईल असे गृहीत धरून कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणाला हंगामी कर्णधार बनवले होते. परंतु अय्यर पूर्णपणे बाहेर पडल्याने या संघाला नेतृत्वाच्या बाबतीत संकटाचा सामना करावा लागू शकतो. राणा याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये दिल्लीचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. असे असले, तरी कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करणे हे त्याच्यासाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे.
अय्यरच्या अनुपस्थितीमुळे केकेआरची फलंदाजी क्षीण झाली आहे. आंद्रे रसेल आणि चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेला व्यंकटेश अय्यर यांच्यात झालेली 50 धावांची जलद भागीदारी हे पंजाबविऊद्धच्या त्यांच्या डावाचे वैशिष्ट्या ठरले. अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज रहमानुल्ला गुरबाज याने केलेल्या धडाकेबाज सुऊवातीमुळेही त्यांना दिलासा मिळू शकतो. त्या सामन्यात केकेआरने त्यांच्या डावाची गती घसरण्यास खंडित वीजपुरवठ्याला जबाबदार धरले होते, परंतु त्यांना कामगिरी सुधारावीच लागेल.
गोलंदाजीच्या आघाडीवर टीम साऊदी आणि सुनील नारायण यांनी बऱ्याच धावा दिलेल्या असून त्यांना याबाबतीत उपापयोजना करावी लागेल. पंजाबच्या फलंदाजांनी केलेली फटकेबाजी पाहता नारायणने त्याची खासियत असलेला ‘मिस्ट्री बॉल’ गमावल्याचे दिसून येत होते. केकेआरच्या माऱ्याची फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांच्याविऊद्ध कसोटी लागेल. मुंबई इंडियन्सवर आठ गडी राखून मिळविलेल्या विजयात बिनबाद 82 धावा करताना कोहलीने आपल्याला सूर गवसल्याचे दाखवून दिलेले आहे.
‘आरसीबी’चे मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि आकाशदीप हे वेगवान त्रिकूट वेगवान गोलंदाजीला पोषक ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीचा फायदा उठविण्याची आशा बाळगून असेल. पण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टोपली याचा खांदा निखळल्याने त्याला मुकावे लागण्याची आणि त्याच्या जागी डेव्हिड विली येण्याची शक्यता आहे.
संभाव्य संघ : कोलकाता नाइट रायडर्स-नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वऊण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, एन. जगदीशन, वैभव अरोरा, सुयश शर्मा, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, लिटन दास आणि मनदीप सिंग.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन अॅलन, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमर, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, आकाशदीप, रीस टोपली, हिमांशू शर्मा आणि मायकेल ब्रेसवेल.
वेळ : संध्याकाळी 7.30 वा.









