लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी
वृत्तसंस्था/ बारामुल्ला
उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्हय़ात एका दुकानावर ग्रेनेड फेकण्याच्या गुन्हय़ात सामील दोन दहशतवादी पोलिसांच्या कोठडीतून फरार झाले आहेत. मागील वर्षीय या दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर तीन जण जखमी झाले होते. या हल्ल्याप्रकरणी मारुफ नजीर आणि शाहिद शौकत या दहशतवाद्यांना मागील वर्षी अटक करण्यात आली होती. हे दोन्ही दहशतवादी बुधवारी सकाळी बारामुल्ला पोलीस स्थानकातून पसार झाले आहेत. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी आता व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे. बारामुल्ला पोलिसांनी दहशतवादी पसार झाल्याच्या घटनेची पुष्टी दिली आहे.









