कंपनीच्या संचालक मंडळाकडून मिळाला ग्रीन सिग्नल
नवी दिल्ली
ऊर्जा क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जीच्या संचालक मंडळाने जेपी चालसानी यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. चालसानी हे आता अश्विनी कुमार यांची जागा घेणार आहेत. कुमार यांनी 5 एप्रिल 2023 रोजी सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये त्यांनी वैयक्तिक कारणामुळे मी राजीनामा देत असल्याचे बुधवारी शेअरबाजाराला सांगितले होते. कंपनीच्या संचालक मंडळाने 4 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत जेपी चालसानी यांची सीईओ म्हणून निवड केली आहे. तसेच तात्काळ प्रभावाने त्यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. चालसानी हे 2016 ते जुलै 2020 यानंतर सुझलॉन समूहात धोरणात्मक सल्लागार म्हणून कार्यरत राहिले. चालसानी यांना वीज क्षेत्राशी संबंधीत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील जवळपास 40 वर्षांचा अनुभव आहे.









