मुंबईमध्ये पहिले स्टोअर : काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या संकल्पनेवर आधारीत असेल नवे स्टोअर
नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून भारतामधील अॅपलला पसंती दर्शवणारे ग्राहक त्यांच्या कंपनीच्या रिटेल स्टोअरची आतुरतेने वाट पाहत होते. अमेरिकन टेक कंपनी अॅपलने मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये आपल्या पहिल्या रिटेल स्टोअरचे अनावरण केले.
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये अॅपलचे फ्लॅगशिप रिटेल स्टोअर सुरू झाले आहे. त्याचे नाव अॅपल बीकेसी आहे. अॅपल इंडिया स्टोअर वेबसाइटवर संबंधित ट्यूटोरियल देखील प्रसिद्ध केले गेले आहे. या रिटेल स्टोअरच्या लाँचिंगमुळे कंपनीचा भारतीय बाजारपेठेत ऑफलाईन प्रवेश होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
काळ्या-पिवळ्या टॅक्सीची संकल्पना
मायानगरी मुंबईच्या प्रतिष्ठित काळ्dया-पिवळ्dया टॅक्सी कलेने प्रेरित होऊन, अॅपल बीकेसीने विविध पृष्ठभागांवर अॅपलच्या विविध उत्पादनांची आणि सेवांची रंगीत पेंटिंग्ज कल्पकतेने कोरली आहेत जी ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उत्तम प्रकारे तयार आहेत.
टेक जायंट अॅपल या महिन्याच्या अखेरीस अधिकृतपणे त्यांचे बीकेसी स्टोअर लाँच करु शकते. यासोबतच अॅपल या वर्षात नवी दिल्लीत आपले दुसरे स्टोअर सुऊ कऊ शकते.
अॅपल आयफोन आणि मॅकबुक्सची भारतात काही काळापासून विक्री होत आहे, परंतु भारतात आतापर्यंत अॅपलचे अधिकृत ऑफलाईन स्टोअर नव्हते. काही दिवसांपूर्वी, अॅपल आपल्या ऑफलाइन स्टोअरसाठी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी 12 पदांसाठी भरती करत होते. अॅपलच्या ऑफलाइन स्टोअर्सच्या रिक्त पदांमध्ये तांत्रिक विशेषज्ञ, व्यवसाय तज्ञ, वरिष्ठ व्यवस्थापक, स्टोअर लीडर आणि इतर पदांचा समावेश आहे.









