Kolhapur Animal News : तासगांव(ता.हातकणंगले) येथील सिध्दोबाच्या डोंगरात ठान मांडून बसलेल्या बिबट्याला आज सकाळी जेरबंद करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी नंतर अखेर वनविभागाने या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. यामुळे गावकऱ्य़ांनी सुटकेचा निश्वास सोडला.
नेमके काय घडले
मौजे तासगांव येथील महेश पाटील यांचे गोसंजीवनी गोशाळा आहे. या गोशाळेत शंभर पेक्षा अधिक गायींचे पालन केले जाते.या गोशाळेच्या दक्षिण बाजुस घनदाट जंगल व दरी आहे. जानेवारी महिन्यात या गायीपैकी एका बछड्यावर बिबट्याने झडप घालुन त्याला जंगलात ओढत नेले.व त्याला ठार मारले.हे बछडे अर्धवट खाल्याच्या अवस्थेत गोशाळेतील कामगारांना दिसुन आले.यानंतर त्यांनी वनविभागास त्याची माहिती दिली.वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी कॅमेरा लावुन बिबट्या असल्याची खात्री केली. त्यानंतर वनविभागाची बचाव पथकाने बिबट्या येत असल्याच्या मार्गावर लोखंडी सापळा लावला होता.या सापळ्यात बिबट्याला अकर्षीत करण्यासाठी शेळी ठेवुन सापळा लपवुन ठेवला होता.वनविभागाची टिम काही दिवस लक्ष ठेवून होती.मात्र बिबट्या तिकडे फिरकला नव्हता. तीन महिन्यानंतर मंगळवारी रात्री अखेर स्वतःहून पिंजऱ्यात तो जेरबंद झाला. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अखेर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









