गोकाक तालुक्यातील अंकलगी अडविसिद्वेश्वरमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांचे आज सोमवार दि.०३ रोजी पहाटे ४ वाजता वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.
आज सायंकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहे. भक्तांना त्यांचे अंतिम दर्शनासाठी श्रीमठात सोय करण्यात आली असून सकाळपासूनच भक्तगण गर्दी करताना दिसत आहेत.









