संशयितांविरोधात गुन्हा नोंद
प्रतिनिधी/ पणजी
पणजी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये टॅक्सी सेवा देण्याचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने उसगाव येथील रहिवाशांची 10.55 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत मुकेश नाईक यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भादंसं 419 व 420 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर धावस्कर आणि दिनकर सावंत अशी संशयितांची नावे आहेत. संशयित दिनकर सावंत यांने आपण एका आयएएस अधिकाऱ्यांचा पीए असल्याचे सांगितले. तक्रारदार मुकेश नाईक याला बनावट प्रस्तावाचे आमिष दाखविले. तारांकित हॉटेलमध्ये टॅक्सीसेवा देण्याचे कंत्राट तुला मिळवून देतो, त्यासाठी तक्रारदाराकडून 10 लाख 55 हजार रुपये उकळले. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









