अलीकडच्या काही वर्षांत भारतातील उकाडय़ाचं प्रमाण विलक्षण वाढत चाललंय. ‘जागतिक तापमानवाढी’चा हा ‘साईड इफेक्ट’…या पार्श्वभूमीवर यंदाचा उन्हाळा त्याच्या पुढं जाण्याची, भारतीयांना कमालीचा घाम फुटण्याची चिन्हं फेब्रुवारी महिन्यात पाऱयानं ज्या प्रकारं उडी मारली त्यावरून दिसू लागलीत…
सध्या भारतातल्या बऱयाच प्रदेशात दिवसा विलक्षण उकाडा आणि रात्री थंडी असा आखाती देशांची आठवण करून देणारा खेळ चाललाय. येऊ घातलेल्या भविष्यकाळाचा हा लहानसा ‘ट्रेलर’ असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये…यंदा आपल्या देशानं दर्शन घेतलंय ते विलक्षण उष्ण फेब्रुवारी महिन्याचं. 2023 वर्षाच्या दुसऱया महिन्यात सरासरी तापमान 29.54 डिग्री सेल्सियसपर्यंत वाढलं. भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) मते, एप्रिल व मे या दोन महिन्यात काय घडणार त्याची ही झलक…त्यांनी म्हटलंय की, ईशान्येतील बहुतेक भाग, पूर्व, मध्य अन् उत्तर-पश्चिम भारतातील अनेक प्रांतांना उष्ण तापमानाच्या नेहमीपेक्षा जास्त झळा पोहोचतील…

चिंतेची बाब म्हणजे गेल्या मोसमापेक्षा जास्त दिवस अंगाची लाही लाही करणाऱया तापमानाला तोंड देण्याची बहुतेक पाळी येणार. तथापि, ‘आयएमडी’च्या मतानुसार, दिलासा मिळण्याची शक्यता आहे ती दक्षिण द्विपकल्प नि महाराष्ट्र राज्यातील प्रदेशांना…सध्या साऱया जगानंच हवामान बदलाच्या युगात प्रवेश केलाय अन् फेब्रुवारी महिना म्हणजे ‘ग्लोबल वॉर्मिंग’चं सर्वांत ताजं उदाहरण…हवामान खात्याचे वैज्ञानिक तसंच ‘हायड्रोमेट’ व ‘ऍग्रोमेट’च्या सल्लागार सेवेचे प्रमुख एस. सी. भान म्हणतात, ‘वाढत्या उष्णतेची शेतकऱयांना झळ पोहोचल्यास कृषी मंत्रालय मदत करण्यास, सेवा देण्यास सज्ज आहे. परंतु अजूनपर्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची पाळी पिकांवर आलेली नाहीये’…
हवामान खात्यानं या क्षणी जून ते सप्टेंबरदरम्यानच्या पावसाबाबत काहीही भविष्यवाणी करण्यास नकार दिलाय तो ‘एल निनो’ आकस्मिकरीत्या हजर होण्याच्या शक्यतेमुळं…त्यामुळं चित्र स्पष्ट होईल ते एप्रिल महिन्यातच. याउलट ‘ला निना’चा संबंध हा नेहमीच चांगल्या ‘मॉन्सून’शी जोडला जातोय. सध्या भारतीय शास्त्रज्ञांच्या मते, ‘ला निना’ पॅसिफिकमध्ये अस्तित्वात आहे…

फेब्रुवारीनं नोंदविलेले उच्चांक अन् दिलेला इशारा…
भारताच्या काही भागांमध्ये, विशेषतः उत्तरेकडील प्रदेशांमध्ये या फेब्रुवारीत पाहायला मिळाली ती तापमानात असामान्य वाढ…देशातील कमाल तापमान 29.54 डिग्री सेल्सियसपर्यंत वाढलं. 1877 नंतरचं हे सर्वोच्च कमाल तापमान. (फेब्रुवारीतील कमाल तापमान सर्वसाधारणपणे 27 डिग्री सेल्सियसच्या आसपास असतं.) परंतु ते काही भागांत 30 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचलं अन् पंजाबमध्ये तर त्यानं 35 डिग्री सेल्सियसचा, तर गुजरातच्या भूजमध्ये चक्क 40 डिग्री सेल्सियचा स्तर गाठला…या महिन्याचं वैशिष्टय़ म्हणजे केवळ कमाल तापमानच नव्हे, तर देशात गेल्या 122 वर्षांतील सर्वोच्च किमान तापमानाची देखील नोंद होऊन पारा 16.31 डिग्री सेल्सियसवर पोहोचला. तो सरासरीपेक्षा 0.81 डिग्री सेल्सियसनं जास्त. या हिशेबानं 1901 नंतरचा हा सर्वांत उष्ण फेब्रुवारी…
गेल्या 17 वर्षांत फेब्रुवारीत वाढत गेलेला पारा…
(फेब्रुवारी महिन्यातलं भारतातलं सरासरी तापमान 27.80 डिग्री सेल्सियस)
| वर्ष | तापमान |
| 2023 | 29.54 |
| 2016 | 29.48 |
| 2006 | 29.31 |
| 2017 | 29.24 |
| 2009 | 29.23 |
1901 नंतर फेब्रुवारीत रात्रीच्या वेळी नोंदविलेलं किमान तापमान
(सरासरी तापमान 15.49 डिग्री सेल्सियस)
| वर्ष | तापमान |
| 2016 | 16.82 |
| 2012 | 16.49 |
| 1937 | 16.45 |
| 2006 | 16.42 |
| 2023 | 16.31 |

| काय म्हणतोय ‘आयपीसीसी’ अहवाल ?… s ‘इंटरगर्व्हमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’नुसार,2050 पर्यंत भारतातील 40 टक्के लोकसंख्येला पाण्याचा तुटवडा भासेल…पाऊस, बर्फ पडणं आदींमध्ये वाढ होईल. तसंच दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढेल… s समुदाच्या पाण्याच्या पातळीत वाढ…त्यामुळं पूर, क्षारयुक्त पाणी, वादळं यांना वाढत्या प्रमाणात तोंड द्यावं लागेल. याचा फटका बसेल तो प्रामुख्यानं भारतातील मुंबई, कोलकाता, चेन्नई, गोवा, कोचिन, पुरीसारख्या प्रदेशांना… s या शतकाच्या मध्यासपर्यंत किनारपट्टीवरील सुमारे साडेतीन कोटी भारतीयांना पुराला सामोरं जावं लागण्याची भीती…विश्वाचा विचार केल्यास जगात सर्वांत जास्त पूर भारतात येतील अन् त्याचा परिणाम होईल तो अर्थव्यवस्थेवर… s जर तापमान 1.5 डिग्री सेल्सियसहून जास्त वाढलं, तर गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या खोऱयांत पूर वाढतील… |
पारा वाढत चाललाय...
s 2020 सालच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अहवालानुसार, 1986 ते 2015 दरम्यान दिवसा तापमान 0.63 डिग्री सेल्सियसनं, तर रात्रीच्या वेळी 0.4 डिग्री सेल्सियसनं वाढलं. हीच स्थिती कायम राहिल्यास 2100 पर्यंत दिवसा तापमान 4.7 डिग्री सेल्सियसनं, तर रात्रीचा पारा 5.5 डिग्री सेल्सियसनं वाढू शकतो…
s वरील अहवालानुसार, तापमानासोबतच या शतकाच्या अखेरीसपर्यंत उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटांची संख्याही तीन ते चार पटींनी वाढण्याची शक्यता (2015 पासून उष्णतेच्या लाटेचा फटका बसलेल्या भारतीय राज्यांची संख्या 2020 पर्यंत दुपटीहून अधिक वाढून 23 वर पोहोचली होती)…
s हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, भारतातील सरासरी तापमान गेल्या काही वर्षांपासून सर्वसाधारण स्तरापेक्षा जास्त राहिलंय. 2022 मध्ये ते 0.51 डिग्री सेल्सियसनं, तर 2021 साली 0.44 डिग्री सेल्सियसनं जास्त राहिलं…जागतिक बँकेच्या अहवालानुसार, योग्य पद्धतींचा अवलंब न केल्यास भारताला धोका आहे तो दरवर्षी सरासरी तापमान 1 ते 2 डिग्रींनी वाढण्याचा…
s भारतात ‘वेट-बल्ब रीडिंग’ म्हणून ओळखलं जाणारं मोजमाप वापरलं जातं. यात तापमान आणि सापेक्ष आर्द्रता एकत्र केली जाते. जगण्यासाठी आवश्यक सरासरीच्या पातळीच्या म्हणजे 35 डिग्री सेल्सियसच्या वर ‘वेट-बल्ब’ तापमान जाणारं भारत हे जगातील पहिल्या काही ठिकाणांपैकी एक बनू शकतं, असा इशारा जागतिक बँकेच्या नोव्हेंबरच्या अहवालात देण्यात आलाय…
| मुंबापुरी सुद्धा तापली… मार्च महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात सांताक्रूझच्या वेधशाळेनं नोंद केली ती मुंबईतील तब्बल 39.30 डिग्री सेल्सियस तापमानाची. त्या दिवशी भारतातील इतर कोणत्याही प्रदेशात इतकं तापमान नव्हतं. त्यानंतर मुंबईकरांना तोंड द्यावं लागलं ते पाऊस, गडगडाट आणि विजा यांना. त्यामुळं तापमान 35.80 डिग्री सेल्सियसपर्यंत उतरलं…विशेष म्हणजे तब्बल 17 वर्षांनी गोराईसारख्या ठिकाणाला दर्शन घडलं ते गारांचं. यापूर्वी 9 मार्च, 2006 या दिवशी गारपीट झाली होती. ‘ |
| उष्णतेचे चटके.... s कृषी ः भारताच्या विविध भागांत फेब्रुवारीमध्येच तापमानात अचानक वाढ झाल्यानं पिकं, खास करून गहू नि मोहरी यांना धोका निर्माण होण्याची भीती भेडसावू लागली होती. मात्र गव्हाच्या पिकांवर जलसिंचन उपाययोजनांमुळे परिणाम झाला नसल्याची माहिती एस. सी. भान यांनी दिलीय s ऊर्जा ः अतिउष्ण हवामानामुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्राला देखील धोका निर्माण होऊ शकतो. वाढत्या तापमानाचा अर्थ ‘s कामगार ः तीव्र उष्णतेचा परिणाम कामगार उत्पादकतेवर होतो. कारण केवळ बांधकाम मजुरांनाच उघडय़ावर काम करावं लागतं असं नाही. भारतातील जवळपास 75 टक्के कर्मचारी हे उष्णतेचा संबंध येणारी कामं करतात, असं जागतिक बँकेचा अहवाल सांगतोय…याशिवाय उष्णतेच्या लाटांचे दीर्घकालीन प्रभाव सार्वजनिक आरोग्यावर होतील ते वेगळे… |
संकलन ः राजू प्रभू









