मालवण / प्रतिनिधी
Shri Dev Khapareshwar Library and Library Colombo celebrates its anniversary with excitement
आकर्षक ग्रंथदिंडी; पारंपारिक वेशभूषेत अबालवृद्ध
सरपंच व सदस्य यांचे दिंडी भजन
1 एप्रिल 2023 रोजी श्री देव खापरेश्वर वाचनालय व ग्रंथालय कोळंब चा 13 वा वर्धापनदिन श्री कृष्ण मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या वर्धापनदिनी सकाळी ठीक 9 वाजता कोळंब ग्राम पंचायत ते श्रीकृष्ण मंदिर कोळंब पर्यंत ग्रंथ दिंडी शोभा यात्रा काढण्यात आली.
कोळंब गावातील चार शाळेतील विद्यार्थी मराठमोळ्या व हिंदुस्थानची संस्कृती दर्शन घडविणाऱ्या वेशभूषेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यां बरोबर शिक्षक वर्ग, पालक, गावातील सर्व मंडळांचे कार्यकर्ते, गावातील सर्व बचत गट महिला, व सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
या दिंडी मध्ये सर्वांनी संस्कृतीचे दर्शन घडेल अशी वस्त्रे पपरिधान करून दिंडीला एक भव्य दिव्य स्वरूप प्राप्त करून दिले होते. यावेळी ग्रामस्थांतून चांगला संदेश सर्वांना मिळेला. सकारात्मक विचारांचा प्रचार प्रसार होईल असे यातून दिसून आले होते. सरपंच व सदस्य यांनी दिंडीत टाल मृदुंग घेत भजन सादर केले.









