भोगावती/प्रतिनिधी
नागेश्वर हायस्कूल (राशिवडे) भागशाळा येळवडे (ता.राधानगरी) येथील विद्यार्थी श्रीधर संभाजी राबाडे (वय १५) याचा पाय घसरून भोगावती नदीतील पाण्यात पडल्याने बुडून मृत्यु झाला. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येळवडे येथील नदीतीरावर घडली.याची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून, घटनास्थळी पो.नि.स्वाती गायकवाड यांनी तातडीने भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली.
याबाबत घटनास्थळावरून व राधानगरी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, येळवडे भाग शाळेत इयत्ता ८ वी च्या वर्गात श्रीधर राबाडे शिकत होता.वडील संभाजी यांच्या बरोबर श्रीधर येळवडे कोदवडे दरम्यानच्या पाणंदी जवळील आपल्या शेताकडे गेला होता. शेतातील काम आटोपून श्रीधर हातपाय धुण्यासाठी दुपारच्या सुमारास भोगावती नदीच्या पात्रामध्ये गेला. मात्र तो पाय घसरुन पाण्यात पडला आणि त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यातच बुडुन मृत्यू झाला. बराचवेळ झाल्याने तो परत आला नाही म्हणून चौकशी केली असता आढळला नाही. म्हणून ग्रामस्थांनी भोगावती नदीपात्रामध्ये शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला.
घटनास्थळी राधानगरीच्या पो.नि.स्वाती गायकवाड,पो.हे.कॉ. कृष्णात यादव, कृष्णात खामकर,अरविंद पाटील यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. सोळांकुर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच भोगावती नदीतीरावर येळवडे व कोदवडे येथील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. तर गावातील महिला गटागटाने घटनेची चर्चा करून शोक व्यक्त केला. संपूर्ण गाव सुन्न झाले होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









