सावंतवाडी / प्रतिनिधी
Shree Ram Navami in full swing at Degwe
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या श्री राम मंदिरात आज मोठ्या भक्तीमय वातावरणात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम सकाळी श्री राममंदिरातील सर्व मुर्तीना दुग्धाभिषेक करण्यात आला.व विधीवत पुजा केली.संपूर्ण मंदिरात विद्युत रोषणाई केली होती.दुपारी १२.०० श्रीराम यांना पाळण्यात घातले.या वेळी गावातील स्त्रियांनी पाळणा गीत म्हटले.विविध धार्मिक कार्यक्रम झाले. गावातील भजनप्रेमी मंडळाने भजने सादर केली.
डेगवे गावातील भाविकांनी श्रीराम मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ मोठ्याप्रमाणात घेऊन तिर्थप्रसादाचा लाभ घेतला.संपूर्ण परीसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन गेले होते. सदर कार्यक्रमास गावातील लोकांनी व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीनी भेटी दिल्या .या भेटीत शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य श्री विजय देसाई यांचा सहभाग होता.









