रायगड प्रतिनिधी
महाड (जि. रायगड) तालुक्यातील राजेवाडी येथील राहणाऱ्या एका महिलेच्या मुलाला पुणे- कोथरूड येथील एमआयटी कॉलेज येथे ॲडमिशन करून देण्यासाठी महाड शहरामधील एक महिला आणि दोन पुरुषांनी 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 2 आरोपींवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही फसवणूक जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ या दरम्यान झाली. सुरैया महमूद इक्बाल काझी (५५ रा.राजेवाडी) यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी दिपीका राजेंद्र उर्फ राजन पवार रा. विरेश्वर मंदिर बाजूला महाड आणि नितीन जाधव किंवा नितीन शिंदे रा. महाड पूर्ण नाव माहीत नाही. या दोघांनी संगनमत करून काझी यांच्या मुलाला पुणे कोथरूड येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कॅम्प्युटर सायन्स या कोर्स करीता ॲडमिशन मिळून देतो असे सांगून त्यांच्या कडून ऑनलाईन मनी ट्रान्सफरद्वारे व कॅश स्वरूपात ३ लाख ५१ हजार पाचशे तसेच २० हजार रुपयांचा लॅपटॉप असे ३ लाख ७१ हजार पाचशे रुपये घेतले. मात्र आपल्या मुलाला अद्याप ॲडमिशन न मिळता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी काझी यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ या दरम्यान घडली. तक्रारीनुसार आरोपी विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम ४२०/४०६/३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.