प्रतिनिधी/ नवी दिल्ली
टिव्हीएस मोटर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार घाना या आफ्रिकन देशात सात नवीन उत्पादने लाँच केली आहेत. कंपनीने अपाचे 180 आणि न्यूओ एनएक्ससह अनेक नवीन मॉडेल उतरवली आहेत. टिव्हीएस मोटर कंपनीचे उपाध्यक्ष (आंतरराष्ट्रीय व्यवसाय) राहुल नायक यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आमची उत्पादने विशेषत: आफ्रिकन बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन विशेषत्वाने डिझाइन केलेली आहेत, जी तेथील ग्राहकांना नक्कीच पसंत पडतील अशी आशा आहे. ही उत्पादने दर्जेदार आणि विश्वासार्ह असल्याचाही दावा यावेळी त्यांनी केला आहे.
सदरच्या उत्पादनांमध्ये सायकली, मोटारसायकल आणि तीनचाकी वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. ही जी विविध गटातील वाहने सादर केली आहेत ती घानामधील ग्राहकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करतील. टिव्हीएस मोटर जगातील पहिल्या पाच दुचाकी कंपन्यांपैकी एक आहे आणि 80 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांची वाहने विक्री होत असल्याचेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे.









