दोषी होण्यासह खासदारकी रद्द झाल्यानंतर प्रथमच राहुल गांधींचे जाहीर भाष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुजरातच्या सुरत न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. संसदेतून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी शनिवारी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी भारतातील लोकशाहीवर हल्ला होत असल्याची रोज नवनवीन उदाहरणे पाहायला मिळत असल्याचे वक्तव्य केले. तसेच मला मारहाण करा, तुरुगात टाका, काही फरक पडत नाही, पण मी जाब विचारणे सोडणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी अदानी प्रकरणावरही विविध प्रश्न उपस्थित केले.
खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्दे उपस्थित करत काही प्रश्न विचारले आहेत. तसेच देशात रोज लोकशाहीवर आक्रमण होत असल्याचे ते म्हणाले. अदानींची शेल कंपनी आहे, त्यात कोणीतरी 20,000 कोटी ऊपये गुंतवले आहेत, ते अदानीजींचे पैसे नसल्याचे नमूद करत अदानींच्या कंपनीतील गुंतवलेले हे 20 हजार कोटी ऊपये नेमके कोणाचे? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही!
मला कशाचीच भीती वाटत नाही, मला तुऊंगात टाकून तुम्ही मला घाबरवू शकत नाही, हा माझा इतिहास नाही. मी भारतासाठी लढत राहीन. मला संसदेत बोलू दिले नाही. मी संसद अध्यक्षांशी पत्रऊपी संवाद साधला पण प्रतिसाद मिळाला नाही. माझे भाषण संसदेतून काढून टाकण्यात आले, पण मी प्रश्न विचारणे सोडणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान भ्रष्ट माणसाला का वाचवताहेत?
पंतप्रधानांवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, मोदी माझ्या पुढच्या भाषणाला घाबरले आहेत, अदानींना मिळालेल्या पैशाचे उत्तर कोणी का देत नाही. हा पैसा कोणाचा आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असल्याचे राहुल गांधी म्हणाले. अदानी हा भ्रष्ट माणूस आहे हे जनतेला समजले असून आता जनतेच्या मनात भारताचे पंतप्रधान या भ्रष्ट माणसाला का वाचवत आहेत? असा मुद्दाही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
मोदी-अदानींचे संबंध जगासमोर आणणार
मी मोदींना प्रश्न न विचारता अदानींवरून प्रश्न विचारत आहे. तुम्ही पीएम मोदींना वाचवा, मात्र, भ्रष्ट अदानींना भाजप कशासाठी वाचवत आहे? कारण तुम्हीच अदानी आहात असा हल्लाबोल त्यांनी केला. अदानींवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला म्हटले जात आहे. देश म्हणजे अदानी आणि अदानी म्हणजे देश आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.
माझ्या भाषणाला पंतप्रधान घाबरले
माझ्या पुढच्या भाषणाची पंतप्रधानांना भीती वाटल्याने मला अपात्र ठरवण्यात आल्याचे राहुल गांधी म्हणाले. माझ्या पुढच्या भाषणाची त्यांना भीती वाटत होती. संसदेतील पुढचे भाषण मी करावे अशी त्यांची इच्छा नव्हती. मी संसदेत आहे की बाहेर मला काही फरक पडत नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. जर त्यांना वाटत असेल की माझे सदस्यत्व रद्द करून, धमकावून, मला तुऊंगात पाठवून ते मला बंद करू शकतात. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहीन, असेही ते पुढे म्हणाले.
भारत जोडो यात्रेवरील माझे कोणतेही भाषण पाहा, सर्व समाज एक आहेत असे मी नेहमीच म्हटले आहे. द्वेष नसावा, हिंसा नसावी. हा ओबीसीचा प्रश्न नाही, नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांचा मुद्दा आहे. भाजप लक्ष विचलित करण्याचे काम करते, कधी ओबीसींबद्दल बोलते, तर कधी परदेशाबद्दल बोलते. मात्र, एकंदर मुख्य मुद्दा टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही राहुल गांधींनी केला.









