वृत्तसंस्था/ मियामी
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने कॅनडाच्या सिबोव्हचा पराभव करत एकेरीची तिसरी फेरी गाठली.
या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या दुसऱया फेरीतील सामन्यात पेगुलाने सिबोव्हचा 6-3, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव केला. पेगुलाने गेल्या वषी या स्पर्धेत उपांत्यफेरी गाठली होती. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या डॅनिली कॉलिन्सने बल्गेरियाच्या टोमोव्हाचा 7-6 (7-3), 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. मात्र, अमेरिकेच्या सहाव्या मानांकित कोको गॉफचा दुसऱया फेरीतील सामना कॅनडाच्या मॅरिनोशी होणार आहे.
पुरुषांच्या विभागात चिलीच्या ख्रिस्टेन गॅरीनने दुसऱया फेरीत प्रवेश मिळविताना मार्कोस गिरॉनवर 6-2, 2-6, 6-4 अशी मात केली. ऑस्ट्रियाचा थिएम आणि इटलीचा सोनेगो, फ्रान्सचा गॅस्केट व ओकोनील यांच्यात लढती होत आहेत.









