200 मेगावॅट सौरऊर्जा होणार उत्पादीत
मुंबई
ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीने महाराष्ट्रामध्ये सोलार प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सोलापूर येथे सोलार प्रकल्प राबवला जाणार असून या अंतर्गत 200 मेगावॅट इतकी वीज उत्पादीत केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने यासंदर्भातील प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचे समजते. सदरचा प्रकल्प 18 महिन्यांमध्ये कार्यरत होणार असल्याचेही कंपनीकडून सांगितले जात आहे. सदरच्या प्रकल्पाच्या कार्यान्वित होण्यानंतर जवळपास 432 दशलक्ष किलोग्रॅम कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी होणार असल्याचे समजते. देशभरामध्ये कंपनीकडून 6.5 गीगावॅट इतकी सोलार ऊर्जा निर्मित केली जाते.









