सावंतवाडी / प्रतिनिधी
Withdraw show cause notice sent to District Surgeon – Mangesh Talwanekar
डॉ. ज्ञानेश्वर एवळे यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पाठविलेली कारणे दाखवा नोटीस मागे न घेतल्यास विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेमार्फत मोर्चे करण्यात येईल असा इचारा अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे तळवणेकर म्हणतात,दोडामार्ग तालुक्यात कार्डीयाक रुग्णवाहीकीची कित्येक वर्षे मागणी होती. दोडामार्ग तालुक्यातील रुग्णांना गोवाबांबुळी शिवाय दुसरा पर्यायच नाही. शासनाने त्यांची मागणी वेळीच पुर्ण केली नाही ही बाब दोडामार्गातील सुज्ञ जनतेने व रुग्णांच्या नातेवाईकांनीच डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांच्या कानावर घातली त्यांना विनंती करुन लोकवर्गणीतून रुग्णवाहीका घ्यावी म्हणून पुढाकार घेतला. अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे डॉ.ऐवाळे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा यापुुर्वी प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. कितीतरी गरीब रुग्णांना रुग्णालयात औषधे नसल्याने पदरमोड करुन स्वत:च्या खिशातून पैसे दिले.
त्यामुळे अशा प्रमाणिक आरोग्य अधिकाऱ्यावर कारणे दाखवा नोटीस बजावणे ही चुकीचीच बाब आहे. जिल्ह्यात डॉक्टर कमी आहेत. जिल्ह्यातील सरकारी सर्वच डॉक्टरांना कुठलीही मशिनरी, यंत्रसामुग्री नसल्याने रात्रंदिवस काम करावे लागते. कधी कधी रात्रौ अपरात्रो द उठावे लागते व रुग्णांना सेवा द्यावी लागते ,याचेच फळ आहे का हे? हल्लीच संप काळात जिल्ह्यातील 95 टक्के आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संप न करता 24 तास सेवा दिली. त्याचेच हे फळ आहे का? त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप नसेल, त्यांच्या पोटावर मारण्याचा हा प्रकार आहे. . जिल्हा शल्यचिकित्सकांना माझी विनंती राहील की, डॉ.ऐवळे सारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिलेली नोटीस तातडीने मागे घ्यावी. रुग्णावाहीकेसाठी गोळा केलेले पैसे दोडामार्गवासीय दानशुर व्यक्तीनी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून गोळा केलेले होते. त्यामुळे जर नोटीस मागे घेतली नाही तर मोर्चा काढण्यात येईल असे तळवणेकर यांनी म्हटले आहे.









