प्रतिनिधी / फोंडा
कुर्टी येथील 6 टीटीआर सैनिकी प्रशिक्षण केंद्राच्या कॅम्पला लागून असलेल्या रानात बुधवार आग लागून या वणवण्यात बरीच झाडे होरपळून गेली. दुपारी 2.15 वा. सुमारास ही आग लागली. दुपारच्या कडक उन्हात वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने अवघ्या काही वेळातच आगीचा वणवा सर्वत्र पसरला. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशिक्षण केंद्रातील साधारण 900 जवान व फोंडा अग्नीशामक दलाचे पथक घटनास्थळी धावले. मोठ्या प्रयासाने त्यांनी आगिवर नियंत्रण मिळवले. सैनिकी प्रशिक्षण केंद्राच्या कुंपणाला लागून असलेल्या 15 ते 20 एकर जमिनीत हा वणवा पसला होता.









