पंतप्रधान नरेंद्र यांच्या यांच्या विरोधात पोस्टर लावल्याबद्दल लोकांना अटक केल्याबद्दल आक्षेप घेत ब्रिटिशांच्या काळातही स्वातंत्र्य सैनिकांनी पोस्टर चिकटवली म्हणुन अटक केली नाही अशी उपहासात्मक टिका केली.
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, “भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तसेच सुभाषचंद्र बोस य़ा देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांनीही अशा प्रकारची पोस्टर्स सर्वत्र लावली होती. पण म्हणुन ब्रिटिशांनी त्यांना कधी अटक केली नाही. स्वातंत्र्यसैनिकांनाही कधी वाटले नसेल कि पोस्टर चिकटवणाऱ्या लोकांना अटक करणारा पंतप्रधान एक दिवस येईल आणि एका रात्रीत 138 एफआयआर नोंदवतील.” केजरीवाल म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “काय चाललंय? गेल्या 24 तासात सहा जणांना अटक करून एक प्रिंटर आणि इतर सहा गरीब लोकांना पोस्टर लावल्याबाबत अटक करण्यात आली. पंतप्रधानांची तब्येत तर ठीक आहे ना?” असा सवाल त्यांनी केला.
आम आदमी पार्टीच्या अध्यक्षांनी शेवटी बोलताना म्हटले की, “‘मोदी हटाओ देश बचाओ हे फक्त एक पोस्टर होते. यात काही फार मोठी गोष्ट नाही. पंतप्रधान इतके असुरक्षित का आहेत की जे सर्वांना तुरुंगात टाकत आहेत? पंतप्रधानांना झोपायला सांगा. ते फक्त 3 तास झोपले तर समस्या आहे. ” केजरीवाल म्हणाले.