अरळीकट्टी येथील श्री बसवेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार २० लाख रुपये अनुदानात करण्यात येत असून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विकास कामांना चालना दिली.
या प्रसंगी बोलताना ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले , मी आमदारपदावर निवड झाल्याक्षणापासून ग्रामीण भागातील विकास अधिक प्रमाणात झाला आहे. ग्रामीण क्षेत्रातील जनतेच्या सहकार्यातून या पुढेही आणखीण विकास कामे करून या क्षेत्रेला एक आदर्श क्षेत्र बनविण्याचे मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवमूर्ती आज्जा , सीसी पाटील, अडिवेश इटगी, सिद्धन्ना सिंगाडी, शिवानंद हलकर्णीमठ, राजू उप्पार, नागन्ना, राजू कट्टीकर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.