न्हावेली / वार्ताहर
Kesarkar, announce date of multispeciality instead of taking lip service – Sarpanch Gunaji Gawde
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे आमदार दीपक केसरकर यांना पुन्हा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल ची आठवण झाली आणि नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा त्यांनी जाहीर करून टाकलं मल्टीपेशालिस्ट हॉस्पिटल लवकरच होणार. पत्रकार परिषद घेऊन दीपक केसरकर यांनी आजपर्यंत अशी अनेक विकास कामे अनेक वेळा जाहीर केली आहेत आणि हे आता जनतेला ठाऊकही झालेला आहे. गेली पाच वर्ष पत्रकार परिषद घेऊन जाहीर करत आहेत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल होणार व टेंडर प्रक्रिया झाली म्हणून भूमिपूजनही करून मोकळे झाले. परंतु अद्यापही एक विट ही सुद्धा त्या ठिकाणी उभी राहिली नसताना मात्र पत्रकार परिषद त्यांच्या चालूच आहेत.
राज घराण्यातील कोणीही जागेची संमती दर्शवली नसली तरी यांनी मात्र मल्टी पेशालिस्ट हॉस्पिटलला जागा द्यायला तयारी दर्शवली म्हणून सुद्धा अनेक वेळा जाहीर केले आहे. मल्टिस्पेशालिटी भुमिपूजन केलेली जागा चोरीला गेली आहे का? असा प्रश्न युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे यांनी उपस्थित केला आहे, जर जागा भेटत नसेल तर वेत्ये येथील जागा देण्यासाठी आम्ही आजही तयार आहोत. त्यांनी भूमिपूजन केलं त्या जागेचा प्रश्न प्रलंबित असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी नारळ फोडलात व श्रेय घेण्याचा प्रयत्न केला व आजही आपण पत्रकार परिषद मध्ये तेच सांगत आहात मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून ते लवकरात लवकर व्हावं अशी आमची अपेक्षा आहे परंतु वारंवार आपण नुसते जाहिरात करत आहात प्रश्न सुटला आता लवकरात लवकर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभे राहणार . गेल्या पाच वर्षात सुसज्ज रुग्णालय नसल्याने कितीतरी रुग्णांना जीव गमवावा लागला याची जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून दीपक केसरकर घेणार आहेत का? सकाळी उठून आश्वासन देऊन तोंड सुख घेण्यापेक्षा रुग्णालयाची तारीख जाहिर करावी अशी भावना गावडे यांनी व्यक्त केली आहे.