फोटो स्टुडिओ जळून खाक
बेळगाव : कांगली गल्लीतील घराला शॉर्ट सक्रिटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज (गुरुवार दि. 23 ) सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत दुकानमालक धनराज ठाकूर यांचे जवळपास 20 लाखाचे नुकसान झाले आहे.
शहराच्या मध्यभागी असलेsल्या कांगली गल्लीत ठाकूर कुटुंबियांचे घर आहे. या घराच्या वरच्या मजल्यावर ठाकूर कुटुंबिय राहतात तर तळ मजल्यावर त्यांचा फोटो स्टुडिओ आहे. या घराला आज सकाळी 11 च्या सुमारास शॉर्ट सक्रिटमुळे अचानक आग लागली. घराचे मालक धनराज ठाकूर यांनी आग विझविण्याचा व स्टुडिओतील साहित्य बाहेर काढण्याचा पर्यंत केला मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे त्यांनी अग्नीशमन दलाला पाचारण केले. पोलीस व अग्नीशमनच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व शर्थिचे प्रयत्न करून आग अटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे फोटो स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. कम्पुटर, फोटोग्राफीचे साहित्य व काही मशिन जळून खाक झाल्या. बाजूच्या दुकानांनाही या आगीची झळ बसल्याचे समजते.
याच दुकानात धनराज ठाकूर यांचे काका मुलांसोबत रहात होते. प्रसंगावधान राखून सर्व जण दुकानातtन बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान तहसिलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.