जोडप्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर प्री-वेडिंगची काही छायाचित्रे मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यात एक जोडपे चिखलात लोळताना दिसून येत आहे. वेगवेगळय़ा भावमुद्रांसह या दोघांनी छायाचित्रे काढून घेतली आहेत. हे जोडपे फिलिपाईन्सच्या ओरमोक शहरात राहणारे आहे. 24 वर्षीय जॉनसी गुतिरेज आणि इमे बोरीनागा यांची ही छायाचित्रे आहेत. दोघांचेही कुटुंब शेती करत असल्याने त्यांनी स्वतःच्या नव्या जीवनाच्या प्रारंभासाठी ही थीम निवडली होती.

लोकांना जॉनसी आणि इमे यांची ही छायाचित्रे अन्य जोडप्यांपेक्षा वेगळी वाटली, कारण त्यांनी निसर्गाबद्दलचे प्रेम यात दाखविण्याचा प्रयत्न केला. तसेच शूट अत्यंत साध्या पद्धतीने पार पडले हेते. फोटोशूट इमेच्या कुटुंबाच्या शेतांमध्ये करविण्यात आले आहे. आम्ही शेतकऱयांच्या कुटुंबांमध्ये लहानाचे मोठे झालो आहोत. याचमुळे ही थीम आम्ही निवडली आहे असल्याचे या जोडप्याने सांगितले आहे. शेतीला एका व्यवसाय म्हणून दर्शविण्याचा मी प्रयत्न करत आहे. शेतीला योग्य ते श्रेय दिले जावे. चिखलात चालणे किती अवघड असते हे लोकांनीही पहावे. तीव्र उन्हात लागवड करताना काय त्रास होतो हे सर्वांना समजणे गरजेचे आहे. मोठा त्रास सहन करूनही शेतकरी कुठल्याही तक्रारीशिवाय हसतमुखपणे जगत असतात. हीच गोष्ट आमच्या फोटोशूटची प्रेरणा ठरल्याचे शासकीय शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱया इमे हिनेने म्हटले आहे.









