तिसरे सत्रात सकारात्मक वातावरण : सेन्सेक्स 140 अंकांनी तेजीत, निफ्टीही वधारत बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात बुधवारी तिसऱ्या सत्रात तेजीची स्थिती राहिली होती. यामध्ये प्रामुख्याने औwषध, वाहन आणि पीएसयू बँक क्षेत्रातील समभागात लिलाव झाल्याने त्याचा फायदा भारतीय बाजारात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांना झाल्याचे दिसून आले.
प्रमुख क्षेत्रांच्या कामगिरीमुळे बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 139.91 अंकांनी वधारुन 58,214.59 बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 44.40 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 17,151.90 वर बंद झाला आहे. यामध्ये बीएसई मिडकॅपचा निर्देशांक हा मात्र प्रभावीत होत बंद झाला तर स्मॉलकॅप मात्र 0.5 टक्क्यांनी वधारत बंद झाला आहे.
निफ्टीमध्ये एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, सनफार्मा आणि टाटा कझ्युमर प्रोडक्ट्स यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. दुसऱ्या बाजूला बीपीसीएल, कोल इंडिया, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स व अॅक्सिस बँक यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले होते.
सेन्सेक्समध्ये मात्र बजाज फिनसर्व्ह सर्वाधिक म्हणजे 2.18 टक्क्यांनी वधारुला तसेच बजाज फायनान्स 2.16 तर सनफार्मा 1.65 टक्क्यांनी तेजीत राहिले.
अभ्यासकांचे मत
भारतीय शेअर बाजारात चढउताराच्या प्रवासात गुरुवारी सकारात्मक वातावरण राहिले. या घटनांमुळे गुंतवणूकदारांमधील आत्मविश्वास वाढला असल्याने जागतिक बँकिंग सिस्टम हा विषयही मागे पडला आहे. फेडरल रिझर्व्हची पतधोरण बैठक व ब्रिटनमधील महागाईदराची आकडेवारी सादर होत असल्याने त्याचा परिणाम हा भारतीय बाजारात राहिला होता. अभ्यासकांच्या अंदाजानुसार फेडरल रिझर्व्हकडून साधारणपणे 0.25 टक्क्यांची वृद्धी होणार असल्याचेही म्हटले आहे.









