ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कोरोनाशी संबंधित परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी 4:30 वाजता उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. आरोग्य विभागाशी संबंधित उच्चस्तरीय अधिकारी या बैठकीला हजर असतील.
कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू लागल्याने देशभरातील कोरोना रुग्ण आणि आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा पंतप्रधान आढावा घेतील. मागील 24 तासात देशात कोरोनाचे 1,134 नवे रुग्ण आढळून आले असून, सध्या 7,026 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.









