मराठी नववर्षाच्या स्वागताचा आज पहिला दिवस. गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
आज कोल्हापुरात माळकर कुटुंबीयानं रितीरिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधले. माळकर कुटूंबियांतर्फे गेल्या चार पिढीपासून भवानी मंडपाला तोरण बांधण्याची परंपरा सुरू आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते भवानी मंडपाला तोरण बांधण्यात आले.
सकाळी अकरा वाजता साखरेची माळ बांधण्यात आली. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न झालं, तेव्हा आनंदोत्सव म्हणून रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील साखरेची माळ बनविली. 25 फुटांची असणारी ही साखरेची माळ त्यावेळी राजवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या भवानी मंडपाला तोरण म्हणून बांधण्यात आली होती. ही परंपरा आजतागायत अखंड सुरू आहे. यंदाही २१ किलोची आणि 25 फुटांची माळ भवानी मंडपाला बांधण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









