तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार : बेळगुंदी येथे 24 मार्च रोजी होणार मेळावा
बेळगाव :राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. हा दुग्धाभिषेक सोहळा यशस्वी झाला. त्याबद्दल तालुक्यातील व शहरातील समस्त जनतेचे आभार मानण्यात आले. याचबरोबर शुक्रवार दि. 24 मार्च रोजी होणारा शेतकरी मेळावाही यशस्वी करण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी अॅड. राजाभाऊ पाटील होते. राजहंसगडावरील सोहळा यशस्वी झाल्याबद्दल आभार मानणे, याचबरोबर बेळगुंदी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, त्यावर चर्चा करण्यासाठी रेल्वेओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे शहर व तालुका म. ए. समितीची मंगळवारी बैठक बोलाविण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्धार करण्यात आला. राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने देणग्या दिल्या. विविध वस्तू दिल्या. याचबरोबर येळ्ळूर व कणबर्गी परिसरातील शिवप्रेमींनी महाप्रसाद करण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल या बैठकीमध्ये त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विधानसभा निवडणुकीबाबतही अनेकांनी आपली मते व्यक्त केली. म. ए. समितीच्या झेंड्याखाली सर्वांनी येण्याचे आवाहन करण्यात आले.
य् ाावेळी व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, एस. एल. चौगुले, यतोजी, मालोजी अष्टेकर आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये माजी महापौर शिवाजी सुंठकर, अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. अमर येळ्ळूरकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे शुभम शेळके, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, विनायक पाटील, मधुरा गुरव, प्रकाश अष्टेकर, रामचंद्र मोदगेकर यांच्यासह इतरांनी यावेळी विचार व्यक्त केले. य् ाा बैठकीला मनोज पावशे, नगरसेवक रवी साळुंखे, म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, मदन बामणे, दुद्दाप्पा बागेवाडी, सतीश पाटील, राजू पावले, लक्ष्मण होनगेकर, भागोजी पाटील, रावजी पाटील, बी. डी. मोहनगेकर, जोतिबा चौगुले, आर. आय. पाटील, परशराम घाडी, एम. जी. घाडी, भुजंग पाटील, आप्पासाहेब किर्तने, श्रीकांत कदम, संजय पाटील, आर. के. पाटील, मोहन बेनके यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.









