सलग दुसऱ्या दिवशीही प्रचंड वाहतूक कोंडी ; ऊग्णवाहिकाही अडकल्या,10 मिनिटांचे अंतर गाठण्यासाठी लागतोय तास
पणजी : अटल सेतू बंद करण्यात आल्यामुळे पर्वरी ते पणजीपर्यंत होणारी वाहतूक कोंडी दुसऱ्या दिवशीही कायम होती. त्यावर कोणताही तोडगा काढण्यात सरकारला अपयश आले आहे. या कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून ऊग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडल्याचे प्रकार समोर आले आहेत. पर्वरी येथील डेल्फिनोपर्यंत वाहतूक तुंबत असल्यामुळे तेथील व अटल सेतूच्या खाली असलेले सिग्नल बंद करण्याची पाळी आली आहे. वाहनांची रांगच एवढी मोठी लागते की ते सिग्नल चालू ठेवता येत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पणजीत चारचाकी वाहने आणणे म्हणजे मोठा मनस्ताप व डोकेदुखी बनली असून वाहनचालक वैतागले आहेत. अटलसेतू वाहनांसाठी खुला करा अशी मागणी पुढे येत असली तरी त्या सेतुवरील रस्त्याचे दुऊस्तीकाम चालू असल्याने ते लगेचच खुला करता येणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. पर्वरीत होणाऱ्या या कोंडीमुळे तेथील सचिवालयात तसेच पणजीतील विविध सरकारी, निमसरकारी व खासगी कार्यालयात कर्मचारी उशिराने पोहोचत असून दैनंदिन प्रवाशांना या कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पणजीतून सुटणाऱ्या व येणाऱ्या अनेक बसगाड्यांना या कोंडीमुळे उशिर होत असून अटलसेतू बंदचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलीसही या कोंडीपुढे हतबल झाल्याचे दिसून येत असून सेतू खुला केल्याशिवाय पर्वरी ते पणजीची वाहतूक कोंडी सुटणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. सरकारने व प्रामुख्याने बांधकाम खात्याने सेतूवरील काम युद्धपातळीवर पूर्ण कऊन तो लवकरात लवकर खुला करावा हा या कोंडीच्या समस्येवर एकमेव मार्ग आहे. या कोंडीत वाहने एकमेकांच्या अगदी जवळ येत असल्याने पर्वरीच्या उतरणीवर वाहने एकमेकांना लागण्याचे प्रकारही घडत असून एखाद्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले तर अनर्थ घडू शकतो, अशी परिस्थिती दिसून येत आहे. सरकारने या कोंडीवर त्वरित उपाय करावेत व वाहनचालकांची त्यातून सुटका करावी, अशी मागणी होत आहे.









