देशातून स्मार्टफोन निर्यातीमुळे इलेक्ट्रॉनिक्सची निर्यात तेजीत
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारी सादर, एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत वेगवान राहिली निर्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्मार्टफोन निर्यातीमुळे भारतातून इलेक्ट्रॉनिक्सची निर्यात तेजीत राहिली आहे. देशातील उत्पादन प्रोत्साहन योजनेंतर्गत (पीएलआय) स्मार्टफोन निर्यातीमुळे एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 या 11 महिन्यांच्या कालावधीत इलेक्ट्रॉनिक्सची भारतातून सर्वात वेगवान निर्यात झाली आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सादर केलेल्या मुख्य 30 निर्यातीवरील डाटाच्या आधारे सादर केलेल्या आकडेवारीतून दिली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत रुपयांच्या तुलनेत पाहता 61.57 टक्के वाढ झाली आहे. 20 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला जो याच कालावधीतील 103,027.19 कोटी रुपयांच्या तुलनेत 2021-22 या आर्थिक वर्षात 166,456.54 कोटींवर पोहोचला.
आर्थिक वर्ष 2022 मध्ये (पीएलआय योजनेचे पहिले वर्ष) इलेक्ट्रॉनिक्स निर्यात 40.5 टक्क्यांनी वाढली, परंतु 152 टक्के दराने वाढत असलेल्या पेट्रोलियम उत्पादनांच्या तुलनेत ही निर्यात मागे राहिली. पण दुसऱ्या वर्षी पेट्रोलियम उत्पादनांपेक्षा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत वाढ झाली.
मोबाईल उपकरणांमुळे इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठी भरभराट होत आहे. एकूण इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत याचा वाटा सुमारे 47 टक्के होता जो एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या 11 महिन्यांत 37 टक्के होता. आयसीइएच्या अंदाजानुसार, एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान मोबाईल फोनची निर्यात 9.5 अब्ज डॉलर किंवा 78,375 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकली आहे.
अन्य बाबी
? एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत 30 प्रमुख वस्तूंच्या एकूण निर्यातीत केवळ 15.7 टक्के वाढ
? भारताच्या व्यापारी मालाच्या निर्यातीत फेब्रुवारीमध्ये 8.8 टक्क्यांनी घट
-इलेक्ट्रॉनिक्स निर्यात 43.02 टक्क्यांच्या वाढीसह 15,916 कोटी रुपयांवर अव्वल









