आष्टा/वार्ताहर
वाळवा येथे वीस वर्षीय तरुणाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली चा स्टेटस ठेवून या तरुणाने आत्महत्या केली. याची वाळवा तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
योगेश सचिन फाळके वय 20 राहणार बाराबिगा वाळवा असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबत संदीप शामराव फाळके राहणार वाळवा यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
सोमवारी सकाळी सातच्या पूर्वी योगेश फाळके या तरुणाने स्वतःच्या घराच्या बाजूला असलेल्या कौलारू शेडमध्ये नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावरील व्हाट्सअप तसेच इंस्टाग्राम वर भावपूर्ण श्रद्धांजलीचा मेसेज अपलोड केला. या दुर्दैवी घटनेने वाळवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भोकरे अधिक तपास करीत आहेत.