रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे प्रवाशांतून नाराजी : प्रशासनो साफ दुर्लक्ष होत असल्याया तक्रारी
वार्ताहर /किणये
हुंचेनट्टी-खादरवाडी संपर्क रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिक व प्रवाशातून होऊ लागल्या आहेत. यामुळे सदर रस्ता दुर्लक्षित झाला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. खादरवाडी, नावगे व हुंचेनट्टी या तिन्ही गावांसाठी हा महत्त्वाचा व संपर्क रस्ता आहे. या रस्त्यावर रोज मोठय़ा संख्येने वाहतूक असते. मात्र सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्डय़ांमुळे अनेक किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तरी मोठी दुर्घटना घडण्याआधीच या रस्त्यावरील खड्डय़ांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. नावगे भागातील कामगार या रस्त्यावरूनच उद्यमबाग येथे कामासाठी ये-जा करतात. खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांचे अपघात घडू लागले आहेत. या संपर्क रस्त्यावरून शेतकरी वर्गीही ये-जा असते. त्यामुळे हा रस्ता सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. या प्रशासनाने या रस्त्याची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
अपघात टाळण्यासाठी रस्ता दास्त करा
खादरवाडी, हुंचेनट्टी, नावगे, बाळगमट्टी, बामणवाडी या भागातील वाहनधारकांची या रस्त्यावरून रोज मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. बऱयाच ठिकाणी रस्त्याचा बहुतांशी भाग उखडून गेला आहे. प्रशासनाच्या संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी या रस्त्याची पाहणी करावी. होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
गोपाळ शिवणगेकर, खादरवाडी









