पुणे / प्रतिनिधी :
भारत आणि आफ्रिकन देशात संयुक्त लष्करी सराव पुण्यात 21 ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. 24 आफ्रिकी देशांच्या तुकडया आणि निरीक्षक यात सहभागी होणार असल्याची माहिती ब्रिगेडियर जेम्स थॉमस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ब्रिगेडिअर थॉमस म्हणाले, आफ्रिका व भारत संयुक्त लष्करी सरावास ‘ओबँट अभ्यास’ असे नाव देण्यात आले आहे. भूसुरुंग निकामी करणे आणि शांतात प्रस्थापित करणे, सामारिक कौशल्ये, कवायती व कार्यपध्दती सक्षम करणे, आफ्रिकन राष्ट्रांच्या सैन्यांशी समन्वय व भारत आणि आफ्रिकी देशांच्या संरक्षण दलात सहकार्य वाढावे, हा या संयुक्त सरावाचा मुख्य उद्देश आहे.
या आधी झालेल्या भारत आफ्रिका संयुक्त युद्ध सरावात 20 देश सहभागी झाले होते. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत संरक्षण सामुग्री प्रदर्शन यावेळी भरवण्यात येणार असून, आफ्रिकी देश संरक्षण उत्पादनांसाठी बाजारपेठ म्हणून लक्ष्य करण्याचा उद्देश या प्रदर्शनाचा आहे. त्याचप्रमाणे भारतीय संरक्षण उद्योगांना याद्वारे प्रोत्साहन मिळेल. दहा दिवस चालणाऱ्या या सरावाची सुरुवात 21 मार्चला औंध मिलिट्री स्टेशन येथे होणार आहे. संरक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या परिषदेत भारत-आफ्रिका संरक्षण भागीदारी व भारत संरक्षण उद्योग संभाव्यता आणि प्रादेशिक सुरक्षेसाठी योगदान या विषयावरील चर्चा केली जाणार आहे.
अधिक वाचा : शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला