23 रोजी वितरण : अॅड. प्रकाश प्रभुदेसाई, महेश सुंदर नायक यांना जिवोत्तम पुरस्कार
काणकोण : श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा श्री विद्याधिराज पुरस्कार यंदा म्हैसूर येथील डॉ. एम. जगन्नाथ शेणॉय यांना देण्यात येणार आहे. दि. 23 रोजी सायं. 4 वा. पर्तगाळी मठाधीश प. पू. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पर्तगाळी मठाचे 23 वे मठाधीश प. पू. श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांच्या महानिर्वाणानंतर प्रथमच हा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. या दिवशी दुपारी 12 वा. महापूजा, महानैवेद्य, त्यानंतर 3.30 वा. वैदिक संभावना आणि पुरस्कार वितरणानंतर सायं. 6 वा. प. पू. स्वामी महाराजांचे आशीर्वचन होणार आहे. याचवेळी खोल, काणकोण येथील अॅड. प्रकाश प्रभुदेसाई आणि येल्लापूर येथील महेश सुंदर नायक यांना जिवोत्तम पुरस्कार, तर बेरोली येथील वेदमूर्ती अनंत पुऊषोत्तम भट, कुमठा येथील वेदमूर्ती वरदराज आनंद भट आणि कुंदापूर येथील वेदमूर्ती बाळकृष्ण लक्ष्मीनारायण भट यांना पुऊषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी केले आहे.









