कोकराझार / वृत्तसंस्था
आसाममधील कोकराझार जिह्यातील एका बाजारपेठेत रविवारी पहाटे लागलेल्या आगीत अनेक दुकाने जळून खाक झाली. गोसाईगाव येथील होरियापेठ परिसरात पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे 12-15 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय आहे. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किमान 12-15 दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने जळून खाक झाल्याचे होरियापेट बाजार व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नूर मोहम्मद यांनी सांगितले.









