Sanjay Kadam on CM Eknath Shinde Ramdas Kadam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी या सभेसाठी पैसे देऊन माणसं आणली असल्याचा आरोप खेडमधील माजी आमदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी केला आहे. तर सभेला 50 हजार शिवसैनिक येतील असा दावा शिंदे गटाने केला आहे. दुसरीकडे भास्कर जाधवांना राजकारणातून संपवणार असल्याचा इशारा रामदास कदम यांनी दिला आहे.कोकणातील जनता शिंदे गटाच्या पाठीशी असल्याचेही ते म्हणाले.
आमदार योगेश कदम कधी गावचा सरपंच झालेला नाही, पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य झालेला नाही. योगेश कदम यांच्या पाठिशी चार वर्षं बाप आहे. त्याला खेडमधलं काय माहिती आहे? मी जिल्हा परिषद सदस्य, पंचायच समिती, सरपंच ते आमदार झालो आहे”, असा टोला संजय कदमांनी यांनी लगावला.मुख्यमंत्री शिंदे यांनी या सभेसाठी पैसे देऊन माणसं आणली आहेत. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची ही शेवटची सभा असेल, खेड हा रामदास कदम यांचा बालेकिल्ला आहे, असे लोक म्हणतात. मात्र, आता केवळ रामदास कदम नावाचा बाल्या शिल्लक आहे. किल्ला कधीच हातातून निसटला असा टोला कदम यांनी लगावला.
याला प्रत्यूत्तर देताना आमदार योगेश कदम म्हणाले की, संजय कदम याची मुख्यमंत्र्यावर बोलण्याची लायकी नाही. बाहेरून लोक आणले तर दाखवून द्या. कोकण आमच्या पाठीशी असल्याचे कदम यांनी म्हटलयं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








