गोकुळ शिरगाव, वार्ताहर
पुणे बेंगलोर महामार्ग 20 लाखाचा पानमसाला जप्त करण्यात आला. शनिवारी (दि. 18) रोजी दुपारी पुणे-बेंगलोर महामार्गावर उजळाईवाडी पुलाखाली गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी पान मसाला ,तंबाखूजन्य पदार्थाची गाडी पकडून दोघांना ताब्यात घेतले असून, वीस लाखाचा माल जप्त केला आहे. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झालीआहे .
याबाबत गोकुळ शिरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी एकच्या सुमारास शाहरुख राजू मुल्ला (वय 22 )रा. इंदिरानगर यमगरणी ता. चिकोडी जि. बेळगाव व विजय नरसु कांबळे( वय 25) रा.कांबळे गल्ली नांगनूर ता. हुकेरी जि. बेळगाव दोघेही कर्नाटक राज्यामधले असून ते आज दुपारी वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधी तंबाखू व सुपारी पान मसाला व सुगंधी जर्दाची वाहतूक करत होते . महाराष्ट्र शासनाने अशा पदार्थांना बंदी घातली आहे. हे दोघेजण हिरा पान मसाला व रॉयल 717 तंबाखू टेम्पो मधून घेऊन जात आसताना आज पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. या कारवाईमध्ये टेम्पो सह त्यांच्याकडून वीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईच्या वेळी महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक, विनायक सपाटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, सहायक फौजदार संजय पडवळ हेड कॉन्स्टेबल रामचंद्र कोळी, वसंत पिंगळे, रणजीत पाटील, संतोष पाटील, शिवानंद मठपती आदींनी ही कारवाई केली .या घटनेची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र कोळी यांनी केली असून अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









