व्हनाळी, वार्ताहर
शेंडूर ता. कागल येथे गहिनीनाथ गैबी पीर उरुसानिमित्त झालेल्या भव्य निकाली जंगी कुस्ती मैदानात बाणगेच्या पै.अरुण बोंगार्डे ने इचलकरंजीच्या पै.विक्रम शेटे याच्यावर स्वारी डावावर मात करून चितपट केले. तर दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या दोन लढतींमध्ये मुरगुडच्या रोहन रंडेने शाहूपुरी आखाड्याच्या लिंगराज होणमाने वर घिस्सा डावार मात केली तर कोल्हापूरच्या राष्ट्रकुल आखाड्याच्या सुनील खताळ ने बाणगेच्या शशिकांत बोंगार्डेने वर मात केली. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत बानगेच्या अतुल डावरे यांने शाहूपुरी तालमीच्या सौरभ केकान याला असमान दाखवले.
मैदानातील विजयी मल्ल असे-
ऋषीकेश काळे (इचलकरंजी),सचिन बाबर,शुभम कोळेकर,विक्रम गावडे,ओंकार लाड,संतोष हिरूगडे,ऋषीकेश देसाई (कागल)प्रथम क्रमांकाचे विजेत्या अरुण बोंगार्डे याला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत ,माजी प.स.सदस्य.बाळासाहेब तुरंबे, विश्वास दिंडोर्ले, सरपंच अमर कांबळे ,उपसरपंच अजित डोंगळे ,गुणाजीराव निंबाळकर, धैर्यशील इंगळे, निवृती निकम,सुखदेव मेथे ,बाबुराव शेवाळे, आदींच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविले. यावेळी सचिन माने,संदिप लाटकर,अनिल मोरे,निखील निंबाळकर,राजू मुजावर,मधुकर भांडवले, मधुकर मेथे आदी उपस्थित होते.
मैदानास गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी उपस्थीती लावली. मैदानात लहान मोठ्या सव्वाशेहून अधिक कुस्त्या झाल्या. ग्रामस्थ व कुस्ती शौकिनांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने या मैदानाचे आयोजन केले होते. पंच म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन पै.नामदेव बल्लाळ, बाळासाहेब मेटकर, के.बी. चौगुले, रवींद्र पाटील यांनी काम पाहिले. राजाराम चौगुले,अवघडी शेळके यांनी बहारदार निवेदन कले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









