जत , प्रतिनिधी
कोसारी (ता.जत) येथे समाईक विहिरीतील गाळ का काढू दिला नाही या कारणावरून चुलता व पुतण्याचा दुहेरी खून केला आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री तिघांना अटक करण्यात आली होती. उर्वरित तिघा आरोपींचा शोध सुरू होता. यातील जत पोलिसाच्या एका पथकाने आरेवाडी (ता. कवठेमंहकाळ) येथून तिघांना अटक करण्यात आहे. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती.
यातील या तानाजी बाबा यमगर, धनाजी बाबा यमगर, (रा. कोसारी) शहाजी बिरा सोलनकर , तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालय समोर उभा केले असता न्यायालयाने २४ मार्चपर्यंत (१२ दिवसाची) पोलीस कोठडी ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोसारी येथील महानूर वस्ती येथे भावकितीलाच यमगर यांच्या समाईक विहिरीतील गाळ काढण्याचा व मालकी हक्कावरून दोन कुटुंबियांमध्ये वाद होता. तानाजी बाबा यमगर व त्याच्या साथीदाराने शनिवारी सकाळी गाळ काढण्याच्या कारणावरून प्रशांत दादासो यमगर व विलास नामदेव यमगर या दोघांवर चाकू कुऱ्हाडीने हल्ला चढवला.यात दोघेही जागीच ठार झाले होते .त्यानंतर प्रवीण विलास यमगर, जयश्री विलास यमगर, बाळाबाई यमगर ,निकिता यमगर, प्रियंका यमगर यांच्यावर हल्ला चढवला यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे करीत आहेत.