कोल्हापूर / प्रतिनिधी
मूळचे कोल्हापूरचे अमेरिका स्थित डॉ. करण शामराव देवणे यानी अंतराळ मोहिमेत यान उड्डाणं करताना व उतरताना त्यातील महिला व पुरुष अंतराळ विरांना कितपत इजा होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्यामध्ये किती फरक आहे याचा अभ्यास करण्यासाठीच्या प्रस्तावास नासा कडून मंजुरी मिळाली आहे.
नासा- एचआरपी स्टुडंट आणि पोस्ट-डॉक ग्रँट ऑगमेंटेशन स्पर्धेसाठी सादर केलेल्या अनेक प्रस्तावांमधून डॉ.करण देवणे यांच्या प्रस्तावाची निवड करून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले असून नासा त्याच्या संशोधनासाठी निधी पुरवणार आहे तो निधी वेक फॉरेस्ट स्कूल ऑफ मेडिसिन, नॉर्थ कॅरोलिना, यूएसए येथे उपलब्द होणार आहे.
डॉ. करण देवणे हे सेवानिवृत्त पोलीस उप निरीक्षक शाम देवणे यांचे सुपूत्र असून त्यांनी आरआयटी इस्लामपूर येथून बी. ई. मेकॅनिकल, आयआयटी दिल्ली मधून एम.टेक व वेक फॉरेस्ट युनिव्हर्सिटी अमेरिका येथून बायो मेडिकल मधून पी एच डी. केलेली आहे. सध्या ते वेक फॉरेस्ट युनिव्हर्सिटी अमेरिका येथील रिसर्च सेंटर मध्ये कार्यरत आहेत.